गर्जा महाराष्ट्रचा २१ वा एपिसोड अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या संस्थेवर झाला. या संस्थेला ९७ वर्ष पूर्ण झाली होती. आता २०१४ मध्ये या संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे १९३२ पासूनच या संस्थेचा चमू परदेशात जात होता. १९३२ च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये खुद्द हिटलरने या क्रीडा मंडळाच्या क्रीडापटूंच्या प्रात्यक्षिकांवर खुश होऊन त्यांना मेडल दिले होते. हिटलर मुळचा चित्रकार. कलेविषयी त्याला आस्था होती. नंतर त्याचं रुपांतर क्रूरकर्मा हुकुमशहात झालं असलं तरी या प्रसंगातून त्याची कलाप्रकारांविषयीची आवडच दिसून येते. फोटो पाहण्यासाठी क्लिक करा-
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची परदेशातील प्रात्यक्षिकं